नद्या आणि माणसे
‘आजचा सुधारक च्या एप्रिल-04 च्या अंकातील ‘माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ लेखावर प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर त्यात काही भर घालण्याच्या उद्देशाने हे लिहीत आहे. नद्या जोडणी महाप्रकल्पाविषयी जी काही माहिती सरकारने उपलब्ध करून दिली आहे, आणि एकंदरीतच भारतासह जगभरातील जल प्रकल्पांच्या इतिहासातून जी माहिती मिळते, ती एकत्रितपणे पाहिली तरी या महाप्रकल्पाला कडाडून विरोध करावा, किती केला …